बांदा/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा व मुंबईत पार पडलेला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर रविवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे.
५ सप्टेंबर २०२४ रोजी नरीमन पाँइंट मुंबई येथे कार्यक्रम संपन्न झाला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, राज्य प्रकल्प संचालक आदि मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक विभागातील माध्यमिक विभाग आदिवासी क्षेत्र, आदर्श महाला शिक्षिका,कला, क्रीडा, दिव्यांग व स्काऊट गाईड या विभागातील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे.
सदर पुरस्कारात बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक जे. डी. पाटील यांचा समावेश होता. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सह्याद्री वाहिनीवर उद्या शिक्षक जे.डी.पाटील यांच्या पुरस्काराचे होणार प्रसारण…
