⚡मालवण ता.२१-:
जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद माध्यमातून आडारी देऊळवाडा येथे दिलीप किर ते मोरये घर व्हाळी पर्यंत गटार बांधून लाद्या बसवणे या कामाचा शुभारंभ मालवण आडारी येथील श्री ईस्वटी महापुरुष येथे पूजन करून व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणी पाठपुराव्यातून हे काम मंजूर झाले असून नागरिकांच्या मागणी नुसार सुमारे १० लाख अंदाजपत्रकीय रक्कमेतून हे काम होत आहे, अशी माहिती यावेळी दीपक पाटकर यांनी दिली. दरम्यान होत असलेल्या विकास कामाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.
यावेळी माजी नगरसेवक जगदीश गांवकर, नीना मुंबरकर, ललित चव्हाण, राजु बिडये,राजु किर, किरण चव्हाण, रुपेश कोकरे, अमित बोर्डवेकर, उमेश चव्हाण, गणेश चव्हाण, शामा आजगावकर, शेखर आंब्रडकर, दर्शन मुंबरकर, श्रीधर खानोलकर, विनायक खानोलकर, बाळा खानोलकर, संजय खानोलकर, संतोष चव्हाण, प्रकाश माणगावकर, मुन्ना फाटक, अर्जुन चव्हाण यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
