आडारी देऊळवाडा येथील कामाशी आम. वैभव नाईक यांचा संबंध नाही…

ललित चव्हाण: ते काम माजी खासदार निलेश राणे यांच्याच पाठपुराव्यातून झाले..

मालवण : (प्रतिनिधी)

महाराष्ट्र सुवर्ण जयंती राष्ट्रीय नगोराथ्यान अंतर्गत देऊळवाडा किर घर ते मोरये घरा पर्यन्त गटारावर लादी बसवणे हे विकास काम भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याच पाठपुराव्यानेच झालेले आहे. या कामाचे श्रेय हे निलेश राणे यांचेच आहे. त्यांनी पालकमंत्री व खा. राणे यांच्या जवळ केलेल्या पाठपुराव्याने मालवण शहरात अनेक कामे मंजूर करुन घेतली. त्यातीलच हे काम आहे. या कामासाठी कार्यसम्राट नगरसेवक दिपक पाटकर, श्री. विजय केनवडेकर व स्थानिक ग्रामस्थांचा सततचा पाठपुरावा असल्यानेच हे काम मंजूर झाले आहे. वैभव नाईक यांचा काडीचाही संबंध या कामाशी नाही, असे भाजपा युवामोर्चा मालवण अध्यक्ष ललित चव्हाण यांनी म्हटले आहे.

आडारी देऊळवाडा येथील या विकास कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केले. खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याच माध्यमातून हे काम मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. त्या नंतर शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यानी या विकास कामाचे श्रेय आ. वैभव नाईक यांचेही असल्याचे सांगत आभार मानले होते. यावर ललित चव्हाण यांनी भाजपतर्फे भुमिका मांडत सदर काम हे माजी खासदार निलेश राणे यांच्याच पाठपुराव्यातून झाले असून या कामाशी आम. वैभव नाईक यांचा कोणताही संबंध नाही असे म्हटले आहे.

You cannot copy content of this page