ठाकरे शिवसेनेचे युवासेना मालवण उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांचा टोला..
मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरातील देवूळवाडा आडारी येथील दिलीप कीर ते मोरये घर गटार कामावरून भाजप आणि ठाकरे सेना यांच्यात श्रेयवाद रंगला आहे हे काम भाजपने केल्याचा दावा भाजप युवा मोर्चा मालवणचे अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केल्यानंतर
ठाकरे शिवसेनेचे युवासेना मालवण उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी त्याला प्रत्युत्तर देताना आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहर देऊळवाडा भागात जनतेची मागणी असलेली अनेक विकासकामे केली. त्यामुळे भाजप युवामोर्चा पदाधिकारी ललित चव्हाण यांनी यांनी रेवतळे स्मशान भूमीचे काम वर्षभरापूर्वी होऊनही निधी का रखडला हे पाहावे. विकासाच्या थापा मारू नये. तसेच आपल्याला निवडणुकीवेळी दिलेलं वाटपाच काम करावे असा सणसणीत टोला हाणला आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री चव्हाण यांनीं म्हटले आहे की, आम. वैभव नाईक यांनी या मतदार संघांचे आमदार व जिल्हा नियोजन समिती सदस्य या माध्यमातून तसेच सत्ता काळात विकासकामांना प्राधान्य दिले. जनतेचे सेवक म्हणून जनतेत राहून आमदार वैभव नाईक कार्यरत असतात. आमदार वैभव नाईक यांचा विकास कामांतील पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे. आडवण ब्रीज, आडवण महावितरण कडील रस्ता, सातेरी मंदिर कडील ब्रिज मजबुतीकरण, वालावलकर घराजवळील व्हाळी, नारायण मंदिर ते रामेश्वर मंदिर पेवर्स बसविणे, छोट्या पानंद काँक्रिटीकरण, नितीन बांदेकर घर ते वालावलकर घरा पर्यत गटर बांधणे, आडारी गणेश मंदिर सुशोभीकरण, दिलीप कीर ते मोरये घर गटार काम, गणेश मंदिर बांधकाम निधी आमदार निधीतून मंजूर आहे. या कामात प्रशासनाचे सहकार्यही महत्वपूर्ण राहिले आहे, असेही उमेश चव्हाण यांनी म्हटले आहे.
