बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..
⚡सावंतवाडी, ता. ११-: नवरात्रोत्सव व घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीचे आमदार दीपक केसरकर यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार केसरकर यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

