⚡मालवण ता.२१-: डेरवण येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मध्ये इ.८वी मध्ये शिकत असलेल्या कु. इशान्त वेंगुर्लेकर याची १७ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये, टोपीवाला हायस्कूल मध्येच इ.१२ वी मध्ये शिकत असलेली कु.पावनी मालणकर हिची १९ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये आणि जय गणेश इंग्लिश स्कूल मालवणमध्ये इ.८वी. मध्ये शिकत असलेला लौकिक तळवडेकर याची १४ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे तिघेही दि.२३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
डेरवण येथे झालेल्या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या सांघिक गटामध्ये जय गणेश इंग्लिश स्कूल मालवणचा लौकिक तळवडेकर, योगेश परुळेकर, प्रज्वल नामनाईक, दीक्षांत शिवापूरकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षाखालील गटात जय गणेश इंग्लिश स्कूलच्या कु.वर्षा परुळेकर,कु.आर्या दिघे,कु.प्राची चव्हाण,कु.श्रिया नरे,कु.दिया पराडकर यांचा संघ उपविजयी ठरला. या यशाबद्दल सहभागी आणि यशस्वी स्पर्धक आणि प्रशिक्षक चंद्रकांत साळवे यांचे सर्वांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.
