⚡मालवण ता.२०-:
वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाची गरज ओळखून मसुरे चांदेर गावचे सुपुत्र उद्योजक डॉ. दीपक परब यांनी लॅपटॉप आणि प्रिंटर मठास भेट दिला.
याबाबत अध्यक्ष दीपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यांनी त्यांचे लक्ष वेधले होते. उद्योजक डॉ. दीपक परब हे केवळ एक यशस्वी उद्योजक नसून एक संवेदनशील आणि दानशूर व्यक्तिमत्त्व सुद्धा आहे. श्री स्वामी समर्थांवर त्यांची अढळ श्रद्धा आहे. मठाच्या कोणत्याही कार्यात किंवा अडचणीच्या वेळी त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. त्यांनी यापूर्वीही मठाला वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले असून, ही संगणकीय भेट मठाच्या आधुनिक वाटचालीस अत्यंत उपयुक्त ठरेल असे चंद्रकांत हडकर म्हणाले.
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी अध्यक्ष दिपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, सरचिटणीस सुनील खरात, उपाध्यक्ष दिनेश साळकर, चिटणीस कल्याण साळकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर, सदस्य रामदास प्रभू, पंडित खोत, सुधीर घागरे, सविता राणे यांनी मदती बद्दल आभार मानले आहेत.
