सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनीष दळवी यांचा करीष्मा
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
मातोंड उपसरपंचपदी वैभवी परब यांची बिनविरोध झाली.
निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर वैभवी परब यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छीमार नेते तांडेल साहेब, पाल गावचे शक्ती केंद्रप्रमुख कमलेश गावडे, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, गोपी बागायतकर, आर्या रेडकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, किशोरी परब सुजाता सावंत यासह भाजपा नेते जगदीश परब, नंदू परब यासह अनेक शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर निवडीबद्दल महायुतीचे पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित उपसरपंच वैभवी परब यांचा सत्कार केला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती शंकर घारे आणि भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनात या प्रक्रियेत महायुती अभेद्य राखण्यात यश मिळवले.
