विधानसभा प्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद..
⚡कणकवली ता.२०-: पर्यावरण संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनसही मोहीम उत्साहात पार पडली. या अभियानाला नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून आपला पाठिंबा नोंदविला.
तुमची एक सही – लोकशाहीच्या बाजूने एक ठाम पाऊल! या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश लोकशाही बळकट करणे, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि पर्यावरणप्रेमी पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या चळवळीला समर्थन देणे हा होता.
या अभियानात सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वाक्षऱ्या करून पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. युवक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख उत्तम लोके, तालुका संघटक राजू राठोड, प्रतीक रासम, रोहित गावडे, रवी विचारे, समर्थ म्हसकर, तन्मय सामंत, महेंद्र नाईक, निखिल जाधव, राज विचारे, आदित्य जोशी, लवेश पांचाळ, अनिरुद्ध जगताप, सर्वेश जाधव, साहिल जाधव, सिद्धेश गावडे, हुसेन लदाफ यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पर्यावरण संरक्षण आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन जनसही अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
