Headlines

सेवाकार्यातून लायन्स क्लब मालवणचे नाव उंचावणार..

अध्यक्ष सहदेव बापर्डेकर:लायन्स क्लब मालवणचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न..

⚡मालवण ता.२०-:
मालवण लायन्स क्लब गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक सेवा कार्य करत आहे. आज माझ्यावर विश्वास दाखवून या क्लबच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. क्लबच्या सेवा कार्यात सर्वांच्या सहकार्याने मी आणखी भर घालीन, सेवाकार्यातून क्लबचे नाव उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांनी केले.

लायन्स क्लब मालवणच्या २०२६- २७ या वर्षाच्या नूतन संचालक मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी दैवज्ञ भवन मालवण येथे संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण यांसह नूतन कार्यकारी मंडळाला लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्यावतीने शपथ देण्यात आली. तसेच पदाधिकारी यांचा पदग्रहण संपन्न झाला.

यावेळी नूतन संचालक मंडळातील पदाधिकारी प्रथम उपाध्यक्ष मनाली दळवी, द्वितीय उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, तृतीय उपाध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, सहसचिव अंजली आचरेकर, सह खजिनदार मुकेश बावकर, टेल टिस्टर मिना घुर्ये, टेमर जयश्री हडकर, स्वच्छ भारत मिताली मोंडकर, मेंबरशिप चेअरमन मेघ:श्याम शंकरदास, एलसीआयएफ चेअरमन स्नेहा जामसंडेकर, पीआरओ दिक्षा गांवकर, जीएसटी चेअरमन, फॅनी फर्नांडिस, जीएलटी चेअरमन पल्लवी खानोलकर, जीएमटी चेअरमन डॉ. हरीश परुळेकर, मिशन 1.5 श्वेता यादव, ॲक्टिव्हीटी चेअरमन नंदिनी गांवकर, हेल्थ अवरनेस वैशाली शंकरदास, लीडरशिप शाम नार्वेकर, साईट फस्ट डॉ. प्रिया रिवणकर, बुथ प्रोग्राम रूपा कांदळगांवकर, फंड रेजिंग ऋग्वेदा धामापूरकर, डायबेटीस अवरनेस डॉ. दर्शन खानोलकर, बुलेटिन ऐडिटर मनिषा गांवकर, रेलिविंग हंगर विश्वास गांवकर, पर्मनंट प्रोजेक्ट महेश कारेकर तसेच संचालक मंडळ सदस्य : नाना साईल, महेश अंधारी (पीएमजेएफ), रुजारिओ पिंटो (एमजीएफ), उमेश नेरुरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, गणेश प्रभुलकर, दत्ताराम रेवणकर, विराज आचरेकर, अरविंद सराफ, मोहन पटेल, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, शांती पटेल, उदय घाटवळ यांचा शपथविधी संपन्न झाला. नवीन सदस्य म्हणून अन्वेषा आचरेकर, शेखर मोर्वेकर, सीए युगांत चव्हाण यांना शपथ देऊन त्यांचे लायन्स क्लबमध्ये स्वागत करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांनी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन (LCIF) ला एक हजार रुपये डॉलर देणगी देत असल्याचे जाहीर केले. यावेळी लायन्स क्लब पदाधिकारी, सदस्य यांनी उभे राहत सहदेव बापर्डेकर यांच्या सेवाकार्या बद्दल आभार व्यक्त केले. यावेळी लायन्स क्लब सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील सुतार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांची कर्तव्ये व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करत क्लबचे सेवाकार्य यापुढेही अधिकाधिकपणे सुरु ठेवण्याचे आवाहन केले. तर नूतन झोन चेअरमन अनुष्का चव्हाण यांनीही सर्वांच्या सहकार्यातून आदर्श झोन बनवूया असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय घाटवळ, मिताली मोंडकर यांनी केले.

यावेळी लायन्स क्लब ज्येष्ठ पदाधिकारी मान्यवर विजय जमदग्नी, केशव फाटक, अजित भणगे, नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक, जिल्हापरिषद सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र पराडकर यांसह लायन्स क्लब पदाधिकारी, सदस्य, रोटरी क्लब पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.

You cannot copy content of this page