Headlines

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी बांदा पोलिसांची मोठी कारवाई…

पाचशेहून अधिक दारूचे खोके: चालकाला घेतले ताब्यात.. बांदा/प्रतिनिधीबांदा पोलिसांनी आज दुपारी बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई केली. कॅन्टर मधून वाहतूक करण्यात येणारे तब्बल ५०० हून अधिक दारूचे खोके जप्त करण्यात आले आहे. मुद्देमालाची मोजदाद सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली आहे. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई निरीक्षक बडवे यांच्या…

Read More

माझ्या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केल्याबद्दल आभार…

राजन तेली: केसरकरांचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया.. ⚡सावंतवाडी ता २०-: आपण घेतलेल्या भूमिकेचे सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केल्याने मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मिशन हे दीपक केसरकर यांना पराभूत करणे हेच असून, त्यासाठी एकत्र येऊन काम करूया असे आवाहन शिवसेना ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी…

Read More

परशुराम उपरकर स्वगृही परतणार…

दुपारी घेणार “मशाल” हाती: मातोश्रीवर पक्षप्रवेश.. ⚡कणकवली ता.२०-: माजी आमदार परशुराम उपरकर अखेर आज स्वगृही परतत असून, आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधणार आहेत. मनसे मधून बाहेर पडल्यानंतर ते कोणत्या निर्णय घेणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर आज ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार…

Read More

बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या कारची वाहतूक पोलिसासह स्टॉल व दुचाकीला धडक देत पलायन…

बांदा/प्रतिनिधीबेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या मोटारिचा पाठलाग करणारा वाहतूक पोलिस राजा राणे यांच्या अंगावर गाडी घालत भर बाजारपेठेतील स्टॉल व दुचाकीला धडक देत मोटार चालकाने पलायन केले. यासाठी मोटार चालकाने तब्बल अर्धा किलोमीटर थरारक रिवर्स गाडी चालविली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कॅमेरे बंद असल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत.ही घटना बांदेश्वर मंदिर नाका येथे सायंकाळी उशिरा…

Read More

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांचे संचालन…

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये शनिवारी सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. यामध्ये कुडाळ पोलिसांसोबत केंद्रीय राखीव पोलीस दल सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. कणकवली पोलीस ठाण्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान व पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. शनिवारी सायंकाळी कणकवली पोलीस…

Read More

सावंतवाडीतील रासाई युवा कला क्रिडा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी…!

सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना आवाहन केलं होतो. निराधार व गोरगरीब व्यक्तींसाठी देवीकडे जमा झालेले अन्नधान सामाजिक बांधिलकी संस्थेकडे द्याव या आवाहनाला प्रतिसाद देत श्री रासाय युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे यांनी सढळहस्ते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे 70 नारळ, 25 किलो तांदूळ ,20 किलो कडधान्य, 5 किलो रवा, तेल, डालडा…

Read More

कुडाळ – शिवापूर येथील कु.श्रुती शामसुंदर राऊळ ठरली फेमिना मिस इंडिया गोवा…

कणकवली;सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर – गाव्हाळवाडी येथील कुमारी श्रुती शामसुंदर राऊळ ही फेमिना मिस इंडिया 2024 या स्पर्धेत फेमिना मिस इंडिया गोवा ही स्पर्धा जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर फेमिना मिस इंडिया-2024 या स्पर्धेत ती अंतिम सात मध्ये आली आहे.कु. श्रुती राऊळ हिच्या या यशा बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.आपल्या या यशात…

Read More

मी भाजपमध्येच राहणार…

निगुडे माजी सरपंच समीर गावडे: महेश सारंग यांनी केली नाराजी दूर.. ⚡सावंतवाडी ता.१९-: निगुडे माजी सरपंच समीर गावडे तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हे काल राजन तेली यांच्यासोबत ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गावात रंगली होती. परंतु महेश सारंग यांनी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली असल्याने त्यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर…

Read More

काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी जेम्स फर्नांडिस यांची नियुक्ती…!

⚡मालवण ता.१९-: मालवण राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी जेम्स सायमन फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रिय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून मेघनाद धुरी हे कामकाज पाहत होते. आता त्यांच्या जागी नूतन तालुकाध्यक्ष म्हणून जेम्स फर्नांडिस यांची…

Read More

निशांत तोरसकर यांची भाजपला सोडचिठ्ठी…

लवकरच मशाल घेणार हाती; राजन तेली बाहेर पडल्यानंतर भाजपमध्ये घमासान… ⚡सावंतवाडी ता.१९-: माजी आमदार राजन तेली यांच्यपाठोपाठ आता भाजपचे सावंतवाडी येथील पदाधिकारी निशांत तोरसकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून, ते लवकरच ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समजली आहे. राजन तेली बाहेर पडल्यानंतर आता भाजपला सुरंग लागल्याचं पाहायला मिळत असून, अनेक पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देत…

Read More
You cannot copy content of this page