विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांचे संचालन…

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये शनिवारी सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. यामध्ये कुडाळ पोलिसांसोबत केंद्रीय राखीव पोलीस दल सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. कणकवली पोलीस ठाण्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान व पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. शनिवारी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांनी कुडाळ शहरांमध्ये संचलन केले. यावेळी कणकवली पोलीस ठाणे ते संपूर्ण बाजारपेठ मधून संचलन करण्यात आले.

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page