Headlines

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खात्याचे योगदान लोकांसमोर आणण्याचा आमचा उद्देश!

प्रा. दिवाकर मुरकर ,
जागतिक टपाल दिनानिमित्त कणकवली पोस्ट मास्तर यांना लायन पोस्ट मास्तर पुरस्काराने गौरविले

कणकवली :
दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर टपाल सेवांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही पत्रव्यवहारांची परंपरा व टपाल खात्याचे योगदान लोकांसमोर आणणे हा या उपक्रमामागे आमचा उद्देश आहे.असे प्रतिपादन कणकवली लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.दिवाकर मुरकर यांनी केले.
जागतिक टपाल दिनानिमित्त शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी कणकवली पोस्ट मास्तर कार्यालयातील पोस्ट मास्तर मंगेश लक्ष्मण मोरये यांना लायन्स क्लबच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जागतिक टपाल दिनानिमित्त दरवर्षी ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा केला जातो. या दरम्यान कणकवली लायन्स क्लबच्या वतीने हा जनजागृती उपक्रम आणि वित्तीय सेवांचे कार्यक्रम अधोरेखीत केले होते. पूर्वीच्या काळी केवळ पत्रे आणि पार्सल तसेच मनी ऑर्डर पोहचविण्याचे काम करणाऱ्या टपाल विभागाने आता डिजिटल बँकिंग सेवा यांची व्याप्ती वाढवली आहे. हे आपल्या अध्यक्षीय मनोगतामधे स्पष्ट करून आजही तेवढ्याच विश्वासाने टपाल वितरणाचे सेवाभावी कार्य पोस्टमन करत आहेत असेही प्रा.मुरकर म्हणाले.
यानिमित्ताने पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पोष्ट मास्तर मंगेश मोरये यांचा शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह
देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ
प्रविण बिरमोळे, सचिव डॉ.अशोक कदम, खजिनदार डॉ.प्रविण गोरूले, डॉ
शमीता बीरमोळे, माजी मुख्याध्यापक विजय पारकर,सामाजिक कार्यकर्ते भास्कर राणे, अनिल सावंत तसेच कर्मचारी उपस्थित होते. डॉ. अशोक कदम यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page