⚡मालवण ता.१९-: मालवण राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी जेम्स सायमन फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रिय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून मेघनाद धुरी हे कामकाज पाहत होते. आता त्यांच्या जागी नूतन तालुकाध्यक्ष म्हणून जेम्स फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री फर्नांडिस हे गेली बरीच वर्षे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रांताध्यक्ष श्री. पटोले यांनी त्यांची काँग्रेसच्या मालवण तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मालवण तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. जेम्स फर्नांडिस यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
