Headlines

माजगावात सोमवारी डबलवारी भजनांचा जंगी सामना…

⚡सावंतवाडी ता.१८-: सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळ, माजगाव नगर यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी (ता. १९) सायंकाळी ७ वाजता ‘डबलवारी भजनांचा जंगी सामना’ आयोजित करण्यात आला आहे.

या भजन सामन्यात श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ, खड्डी-देवगड आणि श्री चैतन्य गगनगिरी प्रासादिक भजन मंडळ, सांताक्रुझ (पूर्व) यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने बुवा श्री. संतोष दत्ताराम जाधव असून, पखवाजाची साथ अक्षय मेस्री व तबल्याची साथ मांगिरीश घाडी देणार आहेत. तर श्री चैतन्य गगनगिरी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने बुवा श्री. श्रीकांत शिरसाट असून, पखवाजाची साथ श्री. विशाल राणे देणार आहेत. या कार्यक्रमाला भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जंगी भजन सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळ, माजगाव नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.”

You cannot copy content of this page