Headlines

एकतर्फी प्रेमातून दामिनी पालवची हत्या…

संशयित साहिल धुरीला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी:हत्येत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास सुरू..

⚡कुडाळ ता.१८-: वर्दे येथील दामिनी किरण पालव या २३ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणाने कुडाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती प्राथमिक पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित साहिल धुरी याला पोलिसांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथे ताब्यात घेतले.

या प्रकरणी संशयित साहिल धुरी याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. संशयिताला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 या हत्येमध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र कुठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस तपासातून या प्रकरणातील आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page