निशांत तोरसकर यांची भाजपला सोडचिठ्ठी…

लवकरच मशाल घेणार हाती; राजन तेली बाहेर पडल्यानंतर भाजपमध्ये घमासान…

⚡सावंतवाडी ता.१९-: माजी आमदार राजन तेली यांच्यपाठोपाठ आता भाजपचे सावंतवाडी येथील पदाधिकारी निशांत तोरसकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून, ते लवकरच ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समजली आहे. राजन तेली बाहेर पडल्यानंतर आता भाजपला सुरंग लागल्याचं पाहायला मिळत असून, अनेक पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे सेनेत प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान भाजप मधील कोणत्याही नेत्यावर आपला राग नसून, फक्त गटबाजीला आपण कंटाळून बाहेर पडत असल्याच त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page