निगुडे माजी सरपंच समीर गावडे: महेश सारंग यांनी केली नाराजी दूर..
⚡सावंतवाडी ता.१९-: निगुडे माजी सरपंच समीर गावडे तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हे काल राजन तेली यांच्यासोबत ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गावात रंगली होती. परंतु महेश सारंग यांनी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली असल्याने त्यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर या बैठकीला त्यांच्यासोबत श्रीकृष्ण म्हाडगुत, किशोर जाधव उपस्थित होते.
