दुपारी घेणार “मशाल” हाती: मातोश्रीवर पक्षप्रवेश..
⚡कणकवली ता.२०-: माजी आमदार परशुराम उपरकर अखेर आज स्वगृही परतत असून, आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधणार आहेत. मनसे मधून बाहेर पडल्यानंतर ते कोणत्या निर्णय घेणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर आज ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असून, मशाल हातात घेणार आहेत. माजी आमदार राजन तेली यांच्यानंतर आता उपरकर शिवसेनेत प्रवेश करत असल्याने जुने शिवसैनिक पुन्हा एकत्र येत असल्याच्या चर्चा सद्या जिल्ह्यात रंगत आहेत.
