पाचशेहून अधिक दारूचे खोके: चालकाला घेतले ताब्यात..
बांदा/प्रतिनिधी
बांदा पोलिसांनी आज दुपारी बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई केली. कॅन्टर मधून वाहतूक करण्यात येणारे तब्बल ५०० हून अधिक दारूचे खोके जप्त करण्यात आले आहे. मुद्देमालाची मोजदाद सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली आहे. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई निरीक्षक बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तुषार वाघाटे, राजू कापसे, धनंजय नाईक, श्री पालकर यांनी पोलीस तपासणी नाक्यावर केली.
