Headlines

मळगाव येथील शारदा विद्यालय आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली…

सुभाष नाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांतर्फे शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा भेट..

⚡सावंतवाडी ता.२० सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता ही जिल्हा परिषद शाळा आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आली असून या शाळेस मळगाव रस्तावाडी येथील रहिवासी शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष नाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरा भेट देण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत नाटेकर यांच्या हस्ते औक्षण करून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, स्वरा वारंग, स्थानिक कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ, मळगाव ऐक्यवर्धक संघाचे कार्यवाह नंदकिशोर राऊळ, ग्रामपंचायत प्राधिकरण सदस्य आनंद देवळी, संजय नाटेकर, उदय सावळ, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, गौरवी मेस्त्री, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेस केलेल्या या मदतीबद्दल सिद्धेश तेंडोलकर यांच्या हस्ते नाटेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शाळेच्यावतीने सुभाष नाटेकर आणि कुटुंबिय यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सुभाष नाटेकर यांनी शाळेच्या मुलांना खाऊ वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा सावंत यांनी केले.

You cannot copy content of this page