आंबा कलम बागेत घुसून कामगारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला…

पोयरे येथे मध्यरात्रीचा थरार; चार अनोळखी संशयितांविरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा.. ⚡देवगड ता.०६-:देवगड तालुक्यातील पोयरे येथील एका आंबा कलम बागेमध्ये अनधिकृत प्रवेश करून बागेत आंबा राखणीच्या कामास असलेल्या कमल साधू नाथ (१९, सध्या रा. पोयरे, मूळ रा. निगासन लखिमपूर खिरी, रा. उत्तरप्रदेश) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यावर कोयत्याने प्रहार केल्याप्रकरणी चार अनोळखी संशयितांवर देवगड पोलीस…

Read More

महागड्या मोबाईलच्या खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याने युवकाची वाढदिवसादिवशीच आत्महत्या…

⚡देवगड ता.०६-: महागड्या नवीन मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे (२२) याने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११.२० वा. च्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड…

Read More

आडेली गावातील ऐतिहासिक ‘शिमगोत्सव’ मंगलमय वातावरणात…

ऐतिहासिक “घोडेमोडणी” उत्सवास झालीय भाविकांची गर्दी.. ⚡वेंगुर्ला ता.०६-: संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील ऐतिहासिक ‘ शिमगोत्सव’ मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या उत्स्फूर्त, अलोट गर्दीत संपन्न झाला. होळी पौर्णिमा संपन्न झाल्यानंतर प्रमुख धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झाली. ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर मंदिर व श्री देव चव्हाटा मंदिर येथे देवहोळी व गावहोळी घालण्यात…

Read More

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला तीन वर्षे मुदतवाढ…

आ. दीपक केसरकर यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार.. ⚡वेंगुर्ला ता.०६-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी राज्य सरकारकडे…

Read More

गिर्ये पवन ऊर्जा प्रकल्पाला मिळणार नवसंजीवनी…

अपारंपरिक ऊर्जा मंत्री सावे यांनी माजी आमदार भाई गिरकर यांची माहिती.. ⚡देवगड ता.०६-:तालुक्यातील गिर्ये गावातील जुन्या पवनऊर्जा प्रकल्पच्या ठिकाणी नव्याने पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे व याच प्रकल्पच्या उर्वरित जागेत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. हे दोन्ही संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबतचा निर्णय झाला असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे…

Read More

बांदा येथे दि. 7 व 8 मार्चला “स्वयंसिध्दा मी” कार्यक्रम…

क्रिएटीव्ह सखी ग्रुप, बांदाचे आयोजन… ⚡बांदा ता.०५-: जागतिक महिला दिनाचे औचित्य सांगून बांदा येथील क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीनेबांदा येथे शनिवार दि. 7 व रविवार दि. 8 मार्च असे दोन दिवस “स्वयंसिध्दा मी ” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल मंदिर नजीक असलेल्या व्यापारी भुवन, बांदा सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या आयोजनाबाबतची…

Read More

युवकांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी युवा संसद महत्त्वाची…

डॉ. राजेंद्र मुंबरकर:कणकवली कॉलेजमध्ये ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ उत्साहात संपन्न.. ⚡कणकवली ता.०६-: युवकांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी युवा संसदसारखे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून युवकांनी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेबाबतचे आपले विचार सरकारपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले. कणकवली कॉलेज येथे आयोजित “विकसित भारत युवा संसद-२०२६” या कार्यक्रमाच्या…

Read More

डॉ. नेरुरकर यांची राणे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला भेट…

⚡कुडाळ ता.०६-: फिलाडेल्फिया- अमेरिका येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. अनिल नेरुरकर यांनी येथील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरला सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले.डॉ. अनिल नेरुरकर यांचे स्वागत राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे ए टि राणे आणि डॉ. जी. टी. राणे यांनी केले. डॉ. नेरुरकर यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले….

Read More

कुडाळ मध्ये महिलादिनी ‘कुडाळ साडी वॉकेथॉन’…

स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजन.. कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधूदुर्ग जिल्ह्यात प्रथमच स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे सकाळी ७ वाजता ”कुडाळ साडी वॉकेथॉन-२०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम फक्त महिलांसाठी आहे तो दोन गटात होणार असून यात महिलांना साडी परिधान…

Read More

‘सक्षम स्त्री सक्षम भारत’ उपक्रम ग्रामीण भागात पोहचवणार…

सानिका मदने:इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून गरजू महिलांना इस्त्री वाटप:जागतिक महिला दिनानिमित्त समाजपयोगी उपक्रम.. कुडाळ : इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणारा सक्षम स्त्री सक्षम भारत उपक्रम ग्रामीण भागात इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या माध्यमातून पोहचवणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी केले. जागतिक महिला दिनाचे…

Read More
You cannot copy content of this page