संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मडूरेत शैक्षणिक साहित्य वाटप
⚡बांदा ता.२३-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मडुरा येथील जि. प. प्राथमिक शाळा नं. २ व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दफ्तर व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. भाजपचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांच्या हस्ते १३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
