माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांची आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…
⚡सावंतवाडी ता.२३-: गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असून, मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेश उत्सवासाठी गावात येत असून, त्याची गैरसोय होऊ नये तसेच या काळात बाजारात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सावंतवाडी आगारातून जादा एस्टी बस सोडण्यात याव्यात अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी सावंतवाडी आगार प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश चतुर्थी सण जवळ आल्याने मुंबई व अन्य ठिकाणाहून गणेश उत्सवासाठी मोठया प्रमाणात चाकरमानी येत असतात, अशा वेळी ग्रामीण भागातील लोक तसेच चाकरमानी यांना बाजारहाटसाठी शहराकडे यावे लागते. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये आपल्या आगारापर्यंत चालू असलेल्या गाड्यांच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात याव्यात.
तसेच मोठया प्रमाणात चाकरमान्यानी कोकणातील गणपती उत्सवाला गावाकडे येत असतात, अशा वेळी त्यांना आपल्या गावाकडे वेळीच पोहोचण्यासाठी गैरसोय होत असते. रात्रीबेरात्री जादा रेल्वे गाडया येत असल्याने चाकरमानी व त्याच्या कुटुंबाना रात्रभर तिष्ठत रहावे लागते. त्यासाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन ते बांदा स्टैंड, रेल्वे स्टेशन ते सावंतवाडी आगार अशा जादा गाड्या सोडण्यात याव्यात जेणेकरुन चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही. याबाबतची मागणी विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना करत त्वरीत कार्यवाही होण्यासाठी निवेदन सादर केले. यावेळी नारायण उर्फ बबन राणे, अशोक दळवी, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
