गणेश उत्सव काळात शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी यंत्रणेला अलर्ट करा…

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची पालिका प्रशासनाकडे मागणी…

⚡सावंतवाडी ता.२३-: शहरात गणेश चतुर्थी काळात पूर्णतः स्वच्छता राखण्यासाठी संबंधित यंत्रणेला अलर्ट करावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान शहरात ठीक ठिकाणी झाडी वाढली आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचा सुद्धा मोठा वावर आहे. या सर्व समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही यावेळी सांगण्यात आले. याबाबत त्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी प्रवीण वाडकर, महेश नार्वेकर, सतीश नार्वेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page