एस. आर. दळवी फाउंडेशनचा पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२३-: नेहरू सायन्स सेंटर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या सहयोगातून एस. आर. दळवी (आय) फाउंडेशन मुंबई यांनी सर्व शिक्षकांसाठी ‘डिजिटल लिटरसी’ या विशेष कोर्सची निर्मिती केली आहे. सदर कोर्स हा ‘शिक्षक सक्षमीकरण’ या उद्देशाने मुंबईस्थित सिंधुदुर्गचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सीता दळवी यांनी सदर फाउंडेशनची निर्मिती केली आहे.
‘डिजिटल लिटरसी’ या कोर्समध्ये पुढील विषयांचा समावेश असणार आहे –
१. बेसिक ऑफ डिजिटल कम्प्युटिंग
२. अंडरस्टँडिंग युजिंग इंटरनेट
३. युजिंग इंटरनेट टूल्स
४. युजिंग एम. एस. ऑफिस (वर्ड, एक्सेल आणि पाॅवर पॉइंट)
५. युजिंग मल्टीमीडिया टूल्स
६. क्रिएटिंग ए वेबसाईट
७. अंडरस्टँडिंग सोशल मीडिया
८. एज्युटेक
९. असेसमेंट अँड सर्टिफिकेशन
‘डिजिटल लिटरसी’ या कोर्सची माहिती –
डिजिटल लिटरसी कोर्स शिक्षकांसाठी मोफत आहे.
डिजिटल लिटरसी कोर्स २० ऑगस्ट २०२२ पासून सुरु करण्यात आला आहे.
प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत ऑनलाईन तासिका होतील.
हा कोर्स फक्त शिक्षकांसाठी आहे.
या कोर्सचा कालावधी ४ महिन्यांचा असेल.
कोर्समध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ७०% हजेरी अनिवार्य असेल.
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाईल.
डॉ. नयन भेडा यांच्या संकल्पनेतून सदर कोर्स सुरुवात करण्यात आला असून नेहरू सायन्स सेंटर, वरळी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तो पूर्ण होणार आहे. यासाठी डॉ. नयन भेडा आणि नेहरू सायन्स सेंटरचे डायरेक्टर उमेश रस्तोगी तसेच ट्रेनर वामन साठे यांचे शिक्षकांना विशेष डिजिटल साक्षर बनविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल एस. आर. दळवी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र दळवी आणि सीता दळवी यांनी आभार मानले आहेत. शिक्षकांना डिजिटल क्षेत्रात एक्सपर्ट करण्यासाठी उचललेले पाऊल स्तुत्य असून त्यासाठी सिंधुदुर्ग टीचर टॉक फोरमचे सिंधुदुर्ग अध्यक्ष महेश लाडू सावंत यांनी तसेच त्यांच्या पूर्ण टीमने फाउंडेशनचे विशेष आभार मानले आहेत.
