‘दुर्ग मावळा’ कोकण विभागचा स्तुत्य उपक्रम
⚡सावंतवाडी ता.२३- : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेंडोली आवेरे शाळेतील पाच, वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वायंगणी – सुरंगपाणी येथील पाच गरजू विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या ‘एक पाटी गरजू विद्यार्थ्यासाठी’ या उपक्रमांतर्गत पाटी वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या पाटीसाठी चाफेली येथील प्रविण सूद यांनी पाच पाट्या, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शैला देवरे यांनी पाच पाट्या सौजन्य केले. त्यांचे दुर्ग मावळाचे अध्यक्ष गणेश नाईक व दुर्ग मावळा परिवाराकडून आभार मानण्यात आले.
