माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांचा उपक्रम
⚡सावंतवाडी ता२३-: माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भटवाडी येथील कै लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नं. 6 मध्ये शाळेतील मुलांना संजू परब मित्रमंडळाच्या वतीने माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दप्तर वाटप करण्यात आले.
यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित, चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब व मुख्याध्यापिका सौ.सायली लांबर यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी पाटेकर चरणी प्रार्थना केली.
तसेच शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. गीता सुतार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आला.
यावेळी मा.नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित, चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब, बुथ अध्यक्ष सचिन साटेलकर, ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथ पेडणेकर,बापू सुभेदार रवींद्र नाईक, शाळेच्या अध्यक्षा श्रीम.अनिशा राणे, उपाध्यक्ष सौ.समीक्षा खोचरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली लांबर, सहाय्यक शिक्षिका सौ. गीता सुतार, बालवाडी शिक्षिका सौ. गावडे मॅडम आदी उपस्थित होते.
