⚡बांदा ता.२३-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मडुरा येथील जि. प. प्राथमिक शाळा नं. २ व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दफ्तर व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. भाजपचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांच्या हस्ते १३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी भाजप कार्यकर्ते अरुण परब, सिद्धेश परब, मुख्याध्यापक संदिप निऊंगरे आदी उपस्थित होते. तसेच अंगणवाडीतील ८ विद्यार्थ्यांना दफ्तर व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका उज्वला परब आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक निऊंगरे यांनी आभार मानले.
