Headlines

सावंतवाडी भटवाडी येथील स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे आगमन…

⚡सावंतवाडी ता.२३-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सावंतवाडी भटवाडी येथील ब्राह्मण देवालय येथे आज गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे आगमन झाले. सायंकाळी शहरातून वाजत गाजत स्वामी पादूका मिरवणूक काढण्यात आली. शहरातील स्वामी भक्तांनी पादूका दर्शनाचा लाभ घेतला. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सावंतवाडी भटवाडी येथील ब्राह्मण देवालय येथे स्वामी…

Read More

संजय नाईक यांनी घेतली मंत्री आशिष शेलार यांची सदिच्छा भेट…!

⚡सावंतवाडी ता.२३-: भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक यांनी घेतली सांस्कृतिक मंत्री मा. श्री.आशिषजी शेलार यांची सदिच्छा भेट. यावेळी गावातील विविध विषयांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

Read More

मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जोपासली…

बाळू कुबल:श्रावण येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.. ⚡मालवण ता.२३-:बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा झेंडा भारतभर पसरवीला. त्याने नेहमीच ज्वलंत विचार अंगीकारले. बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांनी जे विचार दिले त्या विचारांशी बांधील राहून त्यांनी शिवसेना वाढवली, मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना जोपासली, विचारांना छेद देणारे वर्तन त्यांनी कधी केले नाही, म्हणूनच खेड्यापाड्यात शिवसेना जिवंत आहे, प्रत्येक…

Read More

मालवण देऊळवाडा येथे २६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-:मालवण देऊळवाडा येथील श्री महापुरुष पार येथे रविवार दि. २६ जानेवारी रोजी सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता श्रींचे पूजन, दुपारी तीर्थप्रसाद व भजने, रात्री ९.३० वाजता सप्तरंग कलामंच, होडावडा यांचे पौराणिक, संगीत दोन अंकी ट्रिकसीनयुक्त नाटक ‘ब्रम्हांडनायक’ सादर होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात…

Read More

महेश जुवाटकर यांचे लोटांगण प्रदक्षिणा घालण्याचे आंदोलन…

⚡मालवण ता.२३-:मालवण पंचायत समितीतील कामचुकार अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ते महेश जुवाटकर हे फोवकांडा पिंपळपार, मालवण येथे दि. २६ जानेवारीला फोवकांडा पिंपळाभोवती दिवसभर लोटांगण प्रदक्षिणा घालण्याचे आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिलेली आहे. पंचायत समिती मालवण या कार्यालयातील एक अधिकारी कार्यालयीन कामामध्ये अर्जदारांच्या अर्जाबाबत जाणूनबुजून टाळाटाळ किंवा नाहक त्रास देण्याच्या इराद्याने काम करीत…

Read More

मालवणात २६ रोजी ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान…!

⚡मालवण ता.२३-:मालवण शहरातील सर्वांत मोठे ई-यंत्रण म्हणजेच ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियान रविवार दि. २६ जानेवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धन आणि जबाबदारीने ई-कचऱ्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती करणे आहे. युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवाई पर्यटनाला चालना द्यावी…

रविकिरण तोरसकर:राज्यातील पर्यटन वाढीसाठी लवकरच १२ कैराव्हॅन विकत घेणार.. ⚡मालवण ता.२३-:राज्यातील पर्यटन वाढीसाठी एमटीडीसी तर्फे कॅराव्हॅन वाहन आणण्याबरोबरच राज्यातील थंड हवेची, ऐतिहासिक, आणि समुद्र किनाऱ्यांवरील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी हवाई पर्यटन (हेली टुरिझम) सुविधांचा व्यवहार्य अभ्यास अहवाल तयार केला जाणार आहे. यां अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हवाई पर्यटना’ला चालना देणे आवश्यक असून आंबोली,मालवण आणि देवगड ची…

Read More

अद्ययावत तंत्रज्ञान विकासासाठी जिल्हा बँकेला सहकार्य…

राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन.. ओरोस ता २३सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा आणि यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्र राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करेल, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड आशिष शेलार यांनी गुरुवारी बँकेला…

Read More

पक्ष प्रवेश होतच राहणार, पण भाजप शतप्रतिशत राहणार…

मंत्री आशिष शेलार:शिवसेनेच्या पक्ष प्रवेशावर दिली प्रतिक्रिया.. ओरोस ता २३भाजप कार्यकर्त्यांनी बिलकुल संभ्रमात राहण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी ही केडरबेस पार्टी आहे. महायुती ही राज्याच्या व महायुतीतील पक्षांच्या भल्यासाठी केली आहे. पक्षप्रवेश येणं जाणं होतच असतात. कोणी कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गात भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भाजप म्हणून काम करेल. याबद्दल आमच्या…

Read More

विजेच्या धक्याने मृत झालेल्या म्हैशीची नुकसानी द्या…

एल एस निकम यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण.. सिंधुदुर्गनगरी ता २३सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे विजेचा धक्का लागून दोन म्हैसी दगावल्या, याला कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा. तसेच तातडीने नुकसान भरपाई अदा करावी या मागणीसाठी माझगाव येथील एल एस निकम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज निषेध आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील श्री गोविंद…

Read More
You cannot copy content of this page