Headlines

पक्ष प्रवेश होतच राहणार, पण भाजप शतप्रतिशत राहणार…

मंत्री आशिष शेलार:शिवसेनेच्या पक्ष प्रवेशावर दिली प्रतिक्रिया..

ओरोस ता २३
भाजप कार्यकर्त्यांनी बिलकुल संभ्रमात राहण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी ही केडरबेस पार्टी आहे. महायुती ही राज्याच्या व महायुतीतील पक्षांच्या भल्यासाठी केली आहे. पक्षप्रवेश येणं जाणं होतच असतात. कोणी कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गात भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भाजप म्हणून काम करेल. याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गनगरी येथे दिली.
राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड आशिष शेलार हे दोन दिवसांच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. गुरुवारी त्यांनी सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, रणजित देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री शेलार यांचा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सत्कार कार्यक्रमानंतर कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या सरपंच, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असा प्रश्न केला असता त्यांनी वरील उत्तर दिले. तसेच शतप्रतिशत भाजप हा आमचा अजेंठा आहे. त्यामुळे विधानसभे प्रमाणे कार्यकर्त्यांनी काम करावे. संपूर्ण पक्ष एकत्रित आहे. गेलेले काही लोक परत आम्हाला फोन करत आहेत, असे सांगितले.

You cannot copy content of this page