अद्ययावत तंत्रज्ञान विकासासाठी जिल्हा बँकेला सहकार्य…

राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन..

ओरोस ता २३
सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा आणि यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्र राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करेल, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड आशिष शेलार यांनी गुरुवारी बँकेला दिलेल्या भेटी प्रसंगी दिले.
जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे सांस्कृतिक तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाला सपत्नीक सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मंत्री शेलार यांचे स्वागत करुन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गोमय गणेशमुर्ती भेट देवून सत्कार केला. तसेच बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी श्रीमती शेलार यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री शेलार यांनी, सिंधुदुर्ग बँकेने नुकताच ६ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. तसेच बँकेने केलेली प्रगती, अत्याधुनिक डिजीटल सुविधा राबविण्यात निपुणता मिळवीत महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान मिळवलेले आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन केले.

You cannot copy content of this page