एल एस निकम यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण..
सिंधुदुर्गनगरी ता २३
सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे विजेचा धक्का लागून दोन म्हैसी दगावल्या, याला कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा. तसेच तातडीने नुकसान भरपाई अदा करावी या मागणीसाठी माझगाव येथील एल एस निकम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज निषेध आंदोलन सुरू केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील श्री गोविंद चौगुले माझगाव यांच्या दोन म्हैसी विजेचा धक्का लागून मृत पावल्या याबाबत तातडीने नुकसान भरपाई द्यावी तसेच म्हशींचा मृत्यू होण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. माझगाव येथे दोन म्हैसी विजेचा धक्का लागून मृत पावल्या, या घटनेला तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असताना सदर शेतकऱ्यास प्रशासनाकडून कोणतीही मदत अथवा सौजन्य दाखविण्यात आलेले नाही. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. तरी या प्रकरणी चौकशी करून तात्काळ कार्यवाही व्हावी. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज एल एच उर्फ बाळू नीचम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन सुरू केले आहे. तर संबंधित प्रकरणी नुकसान भरपाई देण्यास कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
*जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्यावर तातडीने कारवाई करावी
माझगाव येथील ग्रामीण मार्ग सह विविध कामाची दोष दायित्व कालावधीची अंतर्गत कामे तातडीने मक्तेदाराकडून पूर्ण करून घेऊन सहकार्य करावे, अशा दिलेल्या विनंती अर्जास हरताळ फासल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी १७ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन केले होते . मात्र या आंदोलनानंतरही संबंधितावर कारवाई करण्यास व कार्यवाही करून घेण्यास कर्तव्य कसूर करणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्यावर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून श्री निचम यांनी केली आहे.
