बाळू कुबल:श्रावण येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी..
⚡मालवण ता.२३-:
बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा झेंडा भारतभर पसरवीला. त्याने नेहमीच ज्वलंत विचार अंगीकारले. बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांनी जे विचार दिले त्या विचारांशी बांधील राहून त्यांनी शिवसेना वाढवली, मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना जोपासली, विचारांना छेद देणारे वर्तन त्यांनी कधी केले नाही, म्हणूनच खेड्यापाड्यात शिवसेना जिवंत आहे, प्रत्येक शिवसैनिकांनी विचारनुसार समाजासाठी झटून कार्य करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कार्यकर्ते बाळू कुबल यांनी येथे बोलताना केले
शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी मालवण तालुक्यातील श्रावण येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विनायक बाईत, प्रशांत परब, बाळा वेंगुर्लेकर, संतोष पाणवलकर, दीपक चव्हाण, संतोष परब, बाळा राऊत, बबन परब, प्रकाश कासले, आकाश परब, महेश दळवी, निलेश बाईत, गुरु घाडी, भगवान लाड, प्रकाश सावंत, प्रतिक सावंत, विपुल सावंत, संदीप परब, मंगेश दळवी, भाऊ राऊत, योगेश दळवी, विनायक घाडी, हरेश चव्हाण, नागेश परब, लक्ष्मीकांत परब, रामदास पवार, प्रकाश परब, कृष्णा बाईत, राजू राणे, विजय गवळी, सुनील गवळी, श्याम परब, साईश परब, रंजन पवार, भाऊ मोर्जे शानु वालावलकर यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
