⚡मालवण ता.२३-:
मालवण देऊळवाडा येथील श्री महापुरुष पार येथे रविवार दि. २६ जानेवारी रोजी सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता श्रींचे पूजन, दुपारी तीर्थप्रसाद व भजने, रात्री ९.३० वाजता सप्तरंग कलामंच, होडावडा यांचे पौराणिक, संगीत दोन अंकी ट्रिकसीनयुक्त नाटक ‘ब्रम्हांडनायक’ सादर होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालवण देऊळवाडा येथे २६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम…
