⚡मालवण ता.२३-:
मालवण पंचायत समितीतील कामचुकार अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ते महेश जुवाटकर हे फोवकांडा पिंपळपार, मालवण येथे दि. २६ जानेवारीला फोवकांडा पिंपळाभोवती दिवसभर लोटांगण प्रदक्षिणा घालण्याचे आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिलेली आहे.
पंचायत समिती मालवण या कार्यालयातील एक अधिकारी कार्यालयीन कामामध्ये अर्जदारांच्या अर्जाबाबत जाणूनबुजून टाळाटाळ किंवा नाहक त्रास देण्याच्या इराद्याने काम करीत आहे. त्यांना शासकीय कामाबाबत माहिती विचारली असता चुकीचे मार्गदर्शन करत असतात. वरिष्ठ अधिकारी हे काम चुकारू कर्मचाऱ्यांना सदैव पाठिशी घालतात, मी केलेल्या अर्जाचे बरेच दिवस माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी श्री. जुवाटकर यांनी केली आहे.
