Headlines

आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांतून महिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा…

थकीत ३६ लाख वेतन अदा होणार, सोबत सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ..

⚡कुडाळ ता.१४-: येथील महिला बालरूग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन अदा झाले नव्हते सोबतच नवीन नियुक्ती किंवा मुदतवाढ मिळाली नव्हती, या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य सचिव ई रवींद्रन यांचे लक्ष वेधले होते.

आज या ५२ कर्मचार्यांना मुदतवाढ मिळाली असून रखडलेले वेतनसुद्धा मिळणार आहे. सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ जरी मिळाली असली तरी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत आमदार निलेश राणे व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात चर्चा सुरू असून याबाबतचाही निर्णय लवकरच होईल. सर्व कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून आपल्याला मुदतवाढ मिळवून दिल्याबद्दल महिला बाल रुग्णालयातील कर्मचारी यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page