Headlines

कोळंब हद्दीतील परप्रांतीय कामगारांची आधार कार्ड तपासणी…

⚡मालवण ता.०२-:चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी कोळंब हद्दीतील परप्रांतीय कामगारांच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली. मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशांत पवार, महादेव घागरे यांनी कोळंब परिसरातील परप्रांतीय कामगारांकडे असणाऱ्या आधार कार्डची तपासणी केली. ज्या आंबा बागायतदार व ट्रॉलर मालकांकडे परप्रांतीय कामगार आहेत, त्या मालकांनी परप्रांतीय कामगारांची आधार…

Read Full News

माजगावातील त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा…

सुशील चौगुले: गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केले तक्रार.. ⚡सावंतवाडी ता.०२-: माजगाव ग्रामपंचायत हद्दीमधील गुलाबी तिठा मोरजकर घरामागील नवीन इमारत बांधकाम बेकायदेशीर संरक्षण भिंत अनधिकृत तात्काळ काढण्यासह माजगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर शिस्तभंग कारवाईसह निलंबनाची कारवाईची मागणी माहिती अधिकारी सावंतवाडी तालुकाप्रमुख सुशील चौगुले यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान नैसर्गिक वाहणाऱ्या आहळ्याला मध्ये बदल करून…

Read Full News

खडी वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर आडवा होऊन पलटी…!

⚡बांदा ता.०२-: मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली आरटीओ तपासणी नाक्यानजीक भरधाव वेगात साईडपट्टीचा अंदाज न आल्याने खडी वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर आडवा होऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रात्री उशिरा झाला.याठिकाणी साईडपट्टीला रेडीयम पट्टे किंवा कोणतीही सुरक्षा नसल्याने अपघात होत आहेत. यामध्ये डम्परचे नुकसान झाले. अपघातग्रस्त डंपर कुडाळ येथून गोव्यात…

Read Full News

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ मंजूर…

पश्चिम महाराष्ट्राच्या ३८ वर्षांच्या संघर्षाला यश.. ⚡सावंतवाडी ता.०१-: कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील वकिलांनी गेल्या ३८ वर्षांपासून केलेल्या अथक संघर्षानंतर ही मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर येथील कृती समितीच्या बैठकीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व वकिलांनी प्रचंड जल्लोष करत सर्वोच्च…

Read Full News

मंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध…!

⚡कणकवली ता.०१-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत.दुपारी 4 वाजता कणकवली नगरपंचायती करिता सर्व सोयी सुविधायुक्त, स्वयंचलित व स्थलांतरित करता येणाऱ्या शौचालयाच्या लोकार्पनास उपस्थिती. असा पालकमंत्री नितेश राणे यांचा दौरा आहे.

Read Full News

हुमरमळा-वालावल गावात गुरांच्या लम्पी आजारावर लसिकरण…

शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या पुढाकाराने आज ९० जनावरांना लसिकरण करण्यात आले.हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना ही लम्पी लागण होऊ नये म्हणून माजी…

Read Full News

शिक्षण विभागातर्फे मालवणात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

⚡मालवण ता.०१-:राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला पाच वर्ष पूर्ण होत असल्याने पंचायत समिती मालवण, शिक्षण विभाग व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ग्रामीण रुग्णालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने “अखिल भारतीय शिक्षा समागम २०२५” च्या अनुषंगाने तालुकास्तरीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३० जुलै रोजी अस्थिव्यांग प्रवर्गासाठी शिबीर झाले. तर दि. ४ ऑगस्ट…

Read Full News

मालवण अजगणी कणकवली या सायंकाळी सुटणाऱ्या बस फेरीत शालेय मुलांच्या सोईसाठी बदल…

⚡मालवण ता.०१-:मालवण अजगणी कणकवली या सायंकाळी सुटणाऱ्या बस फेरीत शालेय मुलांच्या सोईसाठी १५ मिनिटे बदल करण्यात आला आहे. मालवण आगारातून ४.३० वा. सुटणारी बसफेरी ४.४५ वा. सुटणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागला आहे. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने देण्यात आली आहे. पालक ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार युवासेना जिल्हप्रमुख संग्राम…

Read Full News

सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी संशयिताला सशर्त जामीन मंजूर…

⚡कुडाळ ता.०१-: सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपित अनिकेत देवदास गावडे रा. पिंगुळी तालुका कुडाळ याला सिंधुदुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रु. ५० हजार रकमेचा जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. संजीव प्रभू आणि ॲड. अश्विनी बोभाटे, ॲड. दिव्या म्हाडदळकर आणि ॲड. सिद्धेश तवटे यांनी काम पाहिले. यासाठी ॲड….

Read Full News

आंबोलीतील प्रसिद्ध वैद्य जुगू यमकर यांचे निधन…

आंबोली,ता.१ : येथील आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असनारे जुगू यमकर (वय १०५) यांचे आज शुक्रवारी पहाटे पाच वाजता निधन झाले. अनेक वर्षे त्यांनी आयुर्वेदिक वैद्य म्हणून औषधे दिली.अनेक रुग्णांना त्याच्या औषधामुळे गुण मिळत असल्याने गोवा,मुंबई,पुणे,बेळगाव,गाडींग्लज अशा दुर वरून लोक औषधा साठी यायचे.अगदी परदेशात देखील औषध पोचले होते.गोव्याचे तत्कालीन मंत्री रमाकांत खलप, आमदार दीपक केसरकर तसेच…

Read Full News

You cannot copy content of this page