⚡मालवण ता.०१-:
मालवण अजगणी कणकवली या सायंकाळी सुटणाऱ्या बस फेरीत शालेय मुलांच्या सोईसाठी १५ मिनिटे बदल करण्यात आला आहे. मालवण आगारातून ४.३० वा. सुटणारी बसफेरी ४.४५ वा. सुटणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागला आहे. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.
पालक ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार युवासेना जिल्हप्रमुख संग्राम साळसकर यांच्या नेतृत्वात महान सरपंच अक्षय तावडे, राजेंद्र धुरी, किशोर पवार, सूर्यकांत कदम, प्रवीण चव्हाण यांनी मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना निवेदन दिले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधले.
दिलेल्या निवेदनात म्हटले होते,मालवण आगार येथून संध्याकाळी मालवण अजगणी कणकवली ही फेरी संध्याकाळी ४.३० वाजता मालवण येथून कणकवली जाण्यास निघते. शालेय मुलांची शाळा सुटण्याची वेळ व गाडी सुटण्याची वेळ काहीशी आधी असल्याने मुलांना शाळेतून घरी जाताना सदर गाडी चुकते. सदर गाडी गेल्यानंतर संध्याकाळी उशिराने ६.३० ला दुसरी गाडी आहे. तोपर्यंत मुलांना गाडीची वाट पाहत बसावे लागते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तरी मालवण वरून ४.३० ला सुटणारी अजगनी -कणकवली फेरीची वेळ बदलून संध्याकाळी ४.४५ करण्यात यावी. जेणेकरून मुलांना घरी लवकर जात येईल. वरील विषयावर प्राधान्याने कार्यवाही करणेत यावी जेणेकरून मुलांना होणार त्रास दूर होईल. असे निवेदनात म्हटले होते. दरम्यान गाडीच्या वेळेत सोमवार 4 ऑगस्ट पासून बदल करण्यात येणार आहे. असे मालवण आगारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
फोटो :
युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या नेतृत्वात महान सरपंच अक्षय तावडे व ग्रामस्थांनी मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना निवेदन दिले.