वेंगुर्ला तालुक्याच्या विकासाभिमुख काम करा ; खा. नारायण राणे…

⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य (9) यांनी खा. नारायण राणे यांची आज शुक्रवारी कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. निवडणुकीतील विजयानंतर ही भेट घेण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, रेडी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, म्हापण जि. प. सदस्या यज्ञा साळगावकर, भाजपा वेंगुर्ला तालुकाप्रमुख पप्पू परब, तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, नवनियुक्त विकास आघाडीचे गटनेते तथा म्हापण पं. स. सदस्य आप्पी फणसेकर, मातोंड पं. स. सदस्य शंकर घारे, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, परुळे पं. स. सदस्य सचिन देसाई, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, रेडी पं. स. सदस्या प्रियांका घाटवळ, वायंगणी पं. स. सदस्या शीतल राऊत, उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, तुळस पं. स. सदस्या सुचिता वजराटकर, आरवली सरपंच समिर कांबळी, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, अमित गावडे, लक्ष्मीकांत कर्पे, सागर राणे, सोमकांत सावंत, दत्ता साळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ला तालुका विकासाभिमुख काम करा, असा सल्ला खा. नारायण राणे यांनी उपस्थित सदस्यांना दिला.

You cannot copy content of this page