मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रा. सुमेधा नाईक प्रथम…

मालवण रोटरी क्लबचे आयोजन..

⚡मालवण ता.०६-:
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब मालवण तर्फे घेण्यात आलेल्या १८ वर्षावरील व्यक्तींसाठी मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रा.सुमेधा नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ५७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत गौरी पाटकर यांनी द्वितीय, डॉ.रुपाली पंतवालावलकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला, तर उत्तेजनार्थ म्हणून अस्मिता रावराणे व हर्षदा माने यांनी यश मिळवले. परीक्षक म्हणून टोपीवाला हायस्कूलचे शिक्षक महेश धामापूरकर यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी कन्याशाळेचे सहकार्य लाभले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ हॉटेल लिलांजली येथे संपन्न झाला. विजेत्यांना रोख रक्कम व चषक प्रदान करून गौरविण्यात आले. तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व बक्षिसे डॉ.अजित लिमये यांनी पुरस्कृत केली होती. यावेळी रोटरी क्लब मालवण, भगीरथ प्रतिष्ठान, डॉ.प्रशांत कोलते, डॉ.विद्याधर तायशेटे यांच्या सहयोगातुन १० गरजु विद्यार्थ्याना सायकली देण्यात आल्या.

यावेळी रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रंजन तांबे, डॉ. प्रसाद देवधर, डॉ.प्रशांत कोलते, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. अजित लिमये, श्रीकृष्ण तारी, भाऊ साळगावकर, उमेश सांगोडकर, अभय कदम, रमाकांत वाक्कर, श्री. वनकुद्रे, प्रविणा शिंदे, प्रदीप सामंत, सुविधा तिनईकर, नंदिनी साटेलकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ लीना लिमये यांनी केले तर आभार महादेव पाटकर यांनी मानले.

You cannot copy content of this page