शिक्षण विभागातर्फे मालवणात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

⚡मालवण ता.०१-:
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला पाच वर्ष पूर्ण होत असल्याने पंचायत समिती मालवण, शिक्षण विभाग व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ग्रामीण रुग्णालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने “अखिल भारतीय शिक्षा समागम २०२५” च्या अनुषंगाने तालुकास्तरीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३० जुलै रोजी अस्थिव्यांग प्रवर्गासाठी शिबीर झाले. तर दि. ४ ऑगस्ट रोजी वाचदोष प्रवर्ग व दृष्टीदोष प्रवर्ग, दि. ५ ऑगस्ट रोजी UDID प्रमाणपत्र सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये मालवण तालुक्यातील शालेय आरोग्य तपासणीतून संदर्भित झालेल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर गरजा असणाऱ्या विद्यार्थांसाठी विविध आरोग्य तपासण्या (दात, डोळे, कान, घसा, त्वचा, अस्थी, इ.) करण्यात येणार असून, विशिष्ट गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांची अधोरेखित आरोग्य गरज लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व सुविधा देण्यात येणार आहे. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page