आसोलीच्या मुख्याध्यापिका वैभवी रायशिरोडकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

⚡बांदा ता.०७-: वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल सावंतवाडी येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सावंतवाडी येथील सावंतवाडी राजवाडा येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र, सिंधुदुर्ग यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले.
रायशिरोडकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, गुणवत्तावाढ, डिजिटल शिक्षणाचा वापर, तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन दिले. स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती, वाचन प्रेरणा, आठवडी बाजार यांसारखे उपक्रम राबवून समाजसहभागातून शाळेच्या उभारणीत मोठा हातभार लावला.
या पुरस्कारामुळे आसोली गाव, वेंगुर्ला तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी रायशिरोडकर म्हणाल्या, “हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण शाळा परिवाराचा आहे.”

You cannot copy content of this page