शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांचा पुढाकार..
⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या पुढाकाराने आज ९० जनावरांना लसिकरण करण्यात आले.
हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना ही लम्पी लागण होऊ नये म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने आज पशुधन पर्यवेक्षक श्री संज्जन यांनी गावात येऊन आपले सहकारी अमित परब यांच्यासह आज गाळवणेवाडी, पडोसवाडी, करमळी वाडी, बिजोळेवाडी या वाड्यांमध्ये फिरुन गुरांना लसीकरण केले. यावेळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पंढरीनाथ गाळवणकर, सुरेश कानडे, रमेश तुळसकर, भिवा गुंजकर, कुसाजी कांबळी, गिरीश देसाई, एकनाथ राणे, तानाजी गुंजकर, अनिल परुळेकर, सिताराम वरक, किशोर पेडणेकर, हेमंत कद्रेकर, शानु परकर, सत्यवान गुंजकर, नरेंद्र पेडणेकर, बारीश उपाध्ये, गोपाळ मांजरेकर, महादेव बंगे, सुमन वालावलकर आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या लसिकरण करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी अमित बंगे, शैलेश मयेकर यांनी सहकार्य केले.