अर्थसंकल्प दिलासादायक तरीही आंबा -काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय अपेक्षित-:श्री. एम. के. गावडे…

⚡वेंगुर्ला ता.०६-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी सादर केलेला अर्थसंकल्प दिलासादायक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला निर्णय स्वागतारह आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव तथा कृषिभूषण एम. के. गावडे यांनी दिली. श्री. गावडे म्हणाले, आज शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बांधकाम व रस्ते याबाबतीत निधीची तरतूद आवश्यक असली तरी आंबा – काजू उत्पादक शेतकरी यांच्याबाबत ठोस निर्णय अपेक्षित होता. 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावर्षी बदलत्या हवामानात शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. ग्लोबल वोर्मिंग हा गेल्या 15 वर्षातील विषय आहे. तरी याबाबतीत विद्यापीठाकडे अपेक्षित उत्तर नाही. विद्यापीठामध्ये 40 टक्के स्टाफ कमी आहे.आज एआय हे प्रभावी तंत्रज्ञान अमलात आले असले तरी विद्यापीठाचे अपेक्षित संशोधन नाही. याबाबतीत सरकारचा होल्ड नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. कर्जमाफी बाबत सरकारचे अभिनंदन आहे, तरीही कर्जमाफीबाबत गाईडलाईन्स आल्यावर बोलणे उचित ठरेल. अर्थसंकल्प|त आणखी काही बाबी अंतर्भुत होणे आवश्यक होते, त्यादृष्टीने सरकारने शेतकऱ्यांना पुढील कालावधीत सरसकट कर्जमाफीसारखे निर्णय अपेक्षित आहेत, असे श्री. गावडे म्हणाले.

You cannot copy content of this page