सुशील चौगुले: गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केले तक्रार..
⚡सावंतवाडी ता.०२-: माजगाव ग्रामपंचायत हद्दीमधील गुलाबी तिठा मोरजकर घरामागील नवीन इमारत बांधकाम बेकायदेशीर संरक्षण भिंत अनधिकृत तात्काळ काढण्यासह माजगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर शिस्तभंग कारवाईसह निलंबनाची कारवाईची मागणी माहिती अधिकारी सावंतवाडी तालुकाप्रमुख सुशील चौगुले यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान नैसर्गिक वाहणाऱ्या आहळ्याला मध्ये बदल करून इमारत बांधकाम व्यवसायिकाला अभय दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.