⚡बांदा ता.०७-: डेगवे येथील दिव्यज्योती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रो-ऍक्टिव्ह राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत ‘ए’ गटातून यशराज विशाल माने याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘आय’ गटातून ओवी लक्ष्मण नाईक हिने प्रथम क्रमांक मिळविला. ‘ई’ गटातून गोविंद कुणाल मस्के व पूर्वी महादेव गवस यांनी प्रथम क्रमांक मिळवून यश मिळविले.
तसेच मीत राजेश विरनोडकर व साईच्छा संदेश कल्याणकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर शिवेन भिकाजी गिरप याने तृतीय क्रमांक पटकावला. वल्लभेश साईनाथ धारगळकर याने चौथा क्रमांक मिळविला, तर गार्गी पुष्पराज धुरी हिने पाचवा क्रमांक मिळवून प्रशालेचे नाव उज्ज्वल केले.
या यशाबद्दल दिव्यज्योती प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, व्यवस्थापक फादर लिजो, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो:-
डेगवे दिव्य ज्योती प्रशालेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक फादर रॉबिन.
प्रो-ऍक्टिव्ह राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत दिव्यज्योती प्रशालेचे उल्लेखनीय यश…
