बांद्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डिजिटल अरेस्ट व फेक कॉल’ विषयावर मार्गदर्शन वर्ग…

⚡बांदा ता.०७-: ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सतर्क करण्यासाठी दैनिक ‘सकाळ’ व ‘ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल अरेस्ट व फेक कॉल’ या विषयावर विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मार्गदर्शन वर्ग बुधवार दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता बांदा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते डिजिटल फसवणुकीचे प्रकार, फेक कॉल ओळखण्याचे मार्ग, तसेच अशा प्रकारच्या घटनांपासून कसे सावध राहावे याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी बांदा परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.

You cannot copy content of this page