गुळदुवे येथे डंपरला अपघात…

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही:मात्र डंपरचे मोठे नुकसान..

⚡सावंतवाडी ता.०७-: आज दुपारी तीन च्या सुमारास मळेवाड वरून आरोंद्याच्या दिशेने मायनिंग वाहतूक करणारा डंपर व आरोंद्यावरून मळेवाड च्या दिशेने जाणारा ट्रक आरोंदा खरी जवळील गुळदुवे येथील उतारावर येताच मायनिंग वाहतूक करणारा डंपर व ट्रक यात ट्रकच्या मागील बाजूला लागून मायनिंग वाहतूक करणारा डंपरवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून थेट रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडला.

मात्र सुदैवाने हा डंपर येथील झाडाला अडकल्याने रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या खोल दरीत जाता जाता वाचला.अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडली असती.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र डंपरचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेली झाडी, अरुंद रस्ते यामुळे वाहन चालवताना सुद्धा मोठी कसरत करावी लागत आहे.मात्र येथील रस्त्यावर होणारी मायनिंग वाहतूक करताना काही डंपर चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून डंपर चालवितात त्यामुळे अपघात घडत असल्याचे बोलले जात आहे.

You cannot copy content of this page