⚡मालवण ता.०२-:
चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी कोळंब हद्दीतील परप्रांतीय कामगारांच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली.
मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशांत पवार, महादेव घागरे यांनी कोळंब परिसरातील परप्रांतीय कामगारांकडे असणाऱ्या आधार कार्डची तपासणी केली. ज्या आंबा बागायतदार व ट्रॉलर मालकांकडे परप्रांतीय कामगार आहेत, त्या मालकांनी परप्रांतीय कामगारांची आधार कार्ड घेऊन मालवण पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन मालवण पोलिसांनी केले आहे.